शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तिसरा समन्स


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तिसरा समन्स
SHARES

टॉप्सग्रुप प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सक्तवसुली संचलनालयाने तिस-यांदा समन्स पाठवला आहे. यापूर्वी दोनवेळा त्यांना समन्स बजावण्यात आला होता. पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचाः- राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १०ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक चौकशीही केली होती. त्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे विहंग सरनाईक हे रुग्णालयात होते. त्यामुळे तेही चौकशीला हजर नव्हते.. परदेशातुन आलेले प्रताप सरनाईक हे होम क्वांरटाईन झाले होते. त्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाही. गुरूवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. या गुरूवारी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.  एमएमआरडीए मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्या त्यां ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्याच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर  गंभीर आरोप केले होते.

हेही वाचाः- विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त

एमएमआरडीए सुरक्षा रक्षक कंत्राट मधील ३० टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील ५०टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा. असे टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी सांगितले होते. मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे एमएमआरडीए चे कंत्रा टॉप्स ग्रुपला मिळाले होते. अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना ५ लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून६ लाख रुपये पगार म्हणून दाखवण्या आली होती. आता नंदा यांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने नवीन गुन्हा दाखल केला आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा