पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत, एक फरार

 wadala
पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत, एक फरार
पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत, एक फरार
See all

वडाळा - पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांचा चौथा साथीदार फैसल वसीम अहमद शेख पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी फैयाज शेख, साजिद वसीम अहमद शेख आणि त्यांची आई बन्नी वसीम अहमद शेख यांना अटक केलीय.

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणारे बीपीटी मार्गाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली. वडाळा टीटी पोलिसांनी चौघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Loading Comments