विरार स्टेशनवरच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

विरार - विरारमध्ये मंगळवारी 7 मार्चला वांद्रे-जयपूर एक्स्प्रेसच्या ट्रेनखाली आल्याने 7 म्हशींना जीव गमवावा लागला. या म्हशी अचानक रेल्वे ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघाताने रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. दरम्यान या म्हशी रुळावर कुठून आल्या हे कळू शकलेलं नाही. यावेळी ड्रायव्हरने अनेकदा हॉर्न वाजवून या म्हशींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. जर ड्रायव्हरनं अचानक ब्रेक दाबला असता तर कदाचित ट्रेनचे डबे घसरण्याची शक्यता होती. पुढे जाऊन शर्थीने ड्रायव्हरने ट्रेन थांबवली. मात्र तोपर्यंत या सर्व म्हशींचा मृत्यू झाला होता.

Loading Comments