परमबीर सिंग यांच्या पाच निकटवर्तीय अधिकाऱ्यांची बदली

खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्यासोबत या पाच अधिकाऱ्यांवर मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

परमबीर सिंग यांच्या पाच निकटवर्तीय अधिकाऱ्यांची बदली
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त आणि एका महिला पोलीस निरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे. 

खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्यासोबत या पाच अधिकाऱ्यांवर मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या अधिकाऱ्यांची आता स्थानिक शस्त्रास्त्र विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे आणि  पोलीस निरीक्षक आशा कोरके यांची बदली करण्यात आली आहे.

दरम्यान,परमबीर सिंग यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व डीसीपी निमित गोयल करतील. त्यांच्यासमवेत एसआयटीमध्ये एसीपी आणि अन्य पाच निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

यामध्ये एम. एम. मुजावर, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रिणम परब, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सचिन पुराणिक, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक, महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा