अंधेरीत घरावर झाड पडून दोन जण जखमी

अंधेरी - पाच घरांवर झाड कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. पालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे आणि ड्रेनेजचं काम सुरू होतं. तेव्हा ही घटना घडल्याचे इथल्या रहिवाशांनी सांगितले. ही घटना सोमवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एक तरुणी आणि लहान मुलगा जखमी झाला. यामध्ये 5 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

Loading Comments