TRP scam: आणखी दोन वाहिन्या मुंबई पोलिसांच्या रडारवर

आतापर्यंत टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात ४० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

TRP scam:  आणखी दोन वाहिन्या मुंबई पोलिसांच्या रडारवर
SHARES

फेक टीआरपी प्रकरणात आता अन्य दोन वाहिन्यांची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नुकतीच अटक केलेल्या हंसाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून ‘महामुव्ही’ व ‘न्यूज नेशन’ या वाहिन्यांची नावे पुढे आली आहेत. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी

फेट टिआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या चौकशीत आता अन्य दोन चॅनेलचा सहभाग पुढे आला आहे. ‘महामुव्ही’ व ‘न्यूज नेशन’ या दोन चॅनेल्सनेही टीआरपीसाठी पैसे वाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी मुख्य आरोपी दिनेश विश्वकर्मा(३७) व रामजी वर्मा(४४) या दोघांना अटक केली होती. हे दोघेही हंसाचे माजी कर्मचारी आहेत. पैसे टीआरपी वाढवण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप आहे. त्यांच्या चौकशीत महामुव्ही व न्यूज नेशन वाहिन्यांसाठीही त्यांनी एजंटकडून पैसे घेतले असल्याचे सांगितले आहे. याशिवाय याप्रकरणी भादंवि कलम १७४, १७९, २०१, २०४ या कलमांची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचाः- कंगनाची सोमवारी होणार चौकशी,  मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस

यापूर्वी याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला अटक केली होती. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी आहे. टीआरपीप्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली होती. संपूर्ण प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. संशयित वाहिन्यांच्या खात्यातील पैशांची व व्यवहारांची तपासणी होणार आहे. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या  यांची नावे याप्रकरणी आली आहे. याशिवाय आणखी वाहिन्यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण त्याबाब अद्याप ठोस पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले याप्रकरणी आतापर्यंत टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात ४० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा