ट्रकनं उडवल्यानं दोन पोलीस गंभीर जखमी

वाकोला - मुंबई वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका ट्रकनं दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना धडक दिलीय. ट्रक अंगावरून गेल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. धनंजय पवार आणि गणेश शिंदे अशी या पोलिसांची नावं आहेत. ते अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. मध्यरात्री 3 च्या सुमारास हा अपघात झाला. या पोलिसांवर सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रॅफिक कंट्रोलकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही पोलीस वाकोला फ्लायओवरहून जाताना त्यांना या ट्रकनं धडक दिली. ट्रकचालक अभय घरशीला वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Loading Comments