चालक झोपेत, गाडी दुभाजकावर

  मुंबई  -  

  मुंबईत एकाच रात्री विविध ठिकाणी दोन अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. किंग्ज सर्कलजवळून एक ट्रक मुंबईहून हुबळीला जात असताना दुभाजकाला धडक बसल्याने पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पोलीस आणि वाहतूक विभागाने क्रेनच्या मदतीने ट्रक हटवला.

  तर दुसरी घटना वांद्र्याच्या खेरवाडीत घडली. भरधाव वेगाने येणारी क्वॉलिस कार दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. त्या कारमध्ये तीन जण होते. ते तिघेही लग्न समारंभातून घरी जात असताना गाडीला अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचालक झोपेत असल्यानेच हा अपघात झाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.