अश्लील चाळे करणाऱ्या दोघांवर गुन्हा

 Borivali
अश्लील चाळे करणाऱ्या दोघांवर गुन्हा

बोरिवली - महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या दोघांवर एमएचबी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा आरोप आहे की, घर खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून शनिवारी 72 वर्षांच्या ललित मयानी आणि ब्रोकर मनोजने त्यांना कारमध्ये बसवून लिंकरोडहून दहिसरकडे नेलं. त्यावेळी मनोज गाडी चालवत होता आणि ललित मागे बसला होता. अचानक त्यांनी निर्जन ठिकाणी कार थांबवली आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. कशीबशी सुटका करून या महिलेनं एमएचबी पोलीस ठाणं गाठून तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

Loading Comments