घाटकोपरमध्ये दोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये दोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - घाटकोपर पोलिसांनी बुधवारी रात्री दोन कोटी रुपयाच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणामुळे नोटबंदी झाल्यानंतरही या दोन कोटींच्या नोटा नक्की आल्या कुठून? आणि त्या कुणाला देण्यासाठी आणल्या होत्या? कोण अजूनही जुन्या नोटा बदलून देण्याचं रॅकेट चालवतंय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या सहाही जणांवर घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, त्यांना अटक केले आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे 

- सचिन पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 7

घाटकोपर बस डेपो जवळील एका टॅक्सीत सहा जण आले होते. या सहा जणांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या 2 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या.

Loading Comments