२ परदेशी महिलांकडून २० कोटींच्या हेरॉइन जप्त


२ परदेशी महिलांकडून २० कोटींच्या हेरॉइन जप्त
SHARES

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर सीमा शुल्क विभागानं २० कोटी रुपयांच्या हेरॉईनसह जप्त केल्या आहेत. २ परदेशी महिलांकडून ह्या हेरॉईन जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी सीमा शुल्क विभागानं २ महिलांना अटक केली. आरोपी युगांडा देशाच्या नागरिक असून त्यांनी सुदानवरून मुंबईत एका तस्कराला देण्यासाठी हेरॉईनचा साठा आणला होता.

क्येनगेरा फातुमा (४५) व त्यांची मुलगी मनसिंबे झायनाह (२७) यांना अटक करण्यात आली आहे. दोघी जुबूवरून दुबई व दुबईवरून मुंबई असा प्रवास करून सोमवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या. संशयित महिला अमली पदार्थासह मुंबईत येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला.

स्कॅनरद्वारे त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात संशयास्पद पूड आढळली.  तपासणी केली असता ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. दोघींकडे तीन किलो ९१० ग्रॅम हेरॉईन सापडले असून त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. दोघींना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

झायनाहकडे एक किलो ९४२ ग्रॅम तर तिची आई फातुमाकडे एका किलो ९६८ ग्रॅम हेरॉईन सापडले. दोघींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा