कार धडकेत दोघे किरकोळ जखमी

मरिन लाइन्स - भरधाव वेगानं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारनं दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना मरिन ड्राइव्हवर सोमवारी पहाटे घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी स्विफ्ट कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी स्विफ्ट डिझायर चालवणाऱ्याच्या विरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. वेगामुळे नेहमीच असे अपघात घडतात. त्यामुळे कुठेतरी या वेगाला आळा घालणं गरजेचं आहे.

Loading Comments