राज्यात दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझर तयार होणार


राज्यात दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझर तयार होणार
SHARES

कोरोना विषाणूंचा संसर्गा च्या पार्श्वभूमिवर बाजारात सॅनिटायझरच्या नावाखाली लोकांकडून जादा पैसे उकळले जात आहे. मुंबई पोलिसांनी मागील काही दिवसात विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणास सँनिटायझर हस्तगत केले. त्या आरोपींच्या चौकशीतून ही बाब पुढे आली.  या पार्श्‍वभूमीवर सरकारने साखर कारखान्यासह राज्यातील एकूण 37 कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझरची निर्मिती होणार असून स्वस्तात व दर्जेदार उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्यानंतर एकदम मागणी वाढल्याने बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. महामारीच्या साथरोगातही बनावट दर्जाहीन सॅनिटायझर बाजारात आणून फसवणूक करण्याचे उद्योग उघडकीस आले. बाजारातील मागणी आणि उत्पादन यातील तफावत लक्षात घेता सरकारने महाराष्ट्रात अल्कोहोल निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याचे आवाहन केले. यानंतर अल्कोहल निमीर्ती करणार्‍या 80 साखर कारखान्यांनी सकारात्मकता दाखवली त्यानुसार 37 कारखान्यांना परवानगीही देण्यात आली आहे. यामुळे आता साखर कारखान्यातून दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझरची निर्मिती होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सॅनिटायझर बनवण्यासाठी 70 टक्के अल्कोहोल, ग्लिसरीन आणि वॉटर कलरचा वापर केला जातो. त्यामुळे साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे इतर ठिकाणीच्या उत्पादनापेक्षा दर्जेदार आणि स्वस्त असणार असल्याने लुट, फसवणूक होणार नाही. हे सॅनिटायझर कारखान्यातून 100 मिली लिटरपासून ते एक लिटर पर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या कोल्हापूर साखर कारखाना, पुण्यातील लोकरंजन प्रकल्प, सांगलीच्या वसंतदादा पाटील शुगर आणि राजाराम बापू साखर कारखान्यातून सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारातील तुटवडा लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा