आईच्या मारहाणीत २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

शनिवारी नानसी घरात खेळताना बेशुद्ध पडल्याचं नेहाने सांगितलं. पत्नीने याची माहिती पतीला दिल्यानंतर मुलीला तात्काळ उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

आईच्या मारहाणीत २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
SHARES

आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

विरार पूर्वमधील  फुलपाडा परिसरातील पारिजात अपार्टमेंटमध्ये शनिवारी ही घटना घडली. सोनुकुमार सोनी (३२) हा पत्नी नेहासह (२२) येथे राहतो. या दोघांना नानसी (२) आणि आणखी एक वर्षाची मुलगी आहे. नेहा सात महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी नानसी घरात खेळताना बेशुद्ध पडल्याचं नेहाने सांगितलं. पत्नीने याची माहिती पतीला दिल्यानंतर मुलीला तात्काळ उचलून विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

अंत्यसंस्कार होण्याआधी स्थानिकांनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी नानसीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर तिच्या पोटाला व डोक्याला दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आले. पोलिसांनी नेहाची कसून चौकशी केली. यावेली तिने नानसीला जोरात मारल्याने ती दरवाजावर आपटल्याचे सांगितले. विरार पोलिसांनी आईविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.   

आरोपी महिला ही नेहमी घरात भांडण करत होती. आपल्या मुलांना वारंवार बेदम मारहाण करीत होती. मुलांच्या ओरडण्याने जर कोणी घरात शेजारी सोडवायला किंवा समजावयाला गेले तर त्यांनाही उलटसुलट बोलून हाकलून देत असत. तिच्या ह्या  रागातूनच मुलीची हत्या झाली. तिला कडक शासन झाले पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया शेजारच्या महिलांनी दिल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा