दाऊदचा हस्तक तारिक परवीनच्या अडचणीत वाढ


दाऊदचा हस्तक तारिक परवीनच्या अडचणीत वाढ
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय हस्तक असलेल्या तारिक परवीन विरोधात पायधुनी पोलिस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला मुंबईच्या आझादनगर परिसरातून अटक केली होती. मुंब्रातील एका हत्येच्या गुन्ह्यात पोलिस तारिकच्या शोधात होते. याशिवाय १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणातही तारिकचं नाव पुढे आलं होतं.


तारिक या गुन्ह्यातील आरोपी

तारिक हा सारा सारा जमीन घोटाळा आणि मुंब्रातील दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मुंब्रात झालेल्या हत्या प्रकरणानंतर तारिक परवीन फरार होता. तारिकला पकडण्याचा प्रयत्न अनेकदा पोलिसांनी केला. मात्र वेळोवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पळून जायचा. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि फारूख टकला या दोघांच्या अटकेनंतर तारिकला अटक झाली होती.


तारिक पुन्हा वादात

पायधुनीत परदेशातून आणण्यात आलेल्या सोन्याच्या व्यवहारावरून परवीन पुन्हा वादात सापडला आहे. तक्रारदार इम्तियाज आणि सादीक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी परदेशातून त्यांनी एका महिलेच्या मदतीने 1 किलो 150 ग्रॅम सोन्याची तस्करी करत ते सोन भारतात आणले, मात्र ठरल्यानुसर या व्यवहारात कमी पैसे दिल्याने या दोघांमधाल वाद विकोपाला गेला. त्यावरून तारिकसह त्याच्या दोन मित्रांनी तक्रारदाराचं अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तारिकने डोक्यावर बंदुक ताणून धमकवल्यानंतर पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय