कुणी जाळली बाइक?

 Dadar
कुणी जाळली बाइक?

साठेनगर - एका अज्ञात व्यक्तीनं शुक्रवारी पहाटेच्यादरम्यान चेंबूरच्या साठेनगर परिसरात पार्क केलेली दुचाकी जाळली आहे. याच परिसरात राहणारे विशाल गवळी यांची ही दुचाकी होती. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारी रात्री ही दुचाकी राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार यांच्या कार्यालयाबाहेर लावली होती. मात्र अज्ञात व्यक्तीनं गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळली. रहिवाशांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ आग विझवली. मात्र या आगीत गाडी पूर्णपणे जळाली असून यामध्ये रवींद्र पवार यांच्या कार्यालयाचे पत्रे देखली जळाले आहेत. याबाबत चेंबूर पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

Loading Comments