सावधान! तुमच्या बेडरूममधल्या हालचाली टिपतोय 'स्मार्ट टीव्ही'

तुमच्या बेडरूममधल्या हालचाली दुसरं कुणीतरी रेकॉर्ड करू लागलं आहे. त्यामुळेच स्मार्ट टीव्ही आणि मोबाइल हाताळणाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या...

SHARES

तुम्ही मोबाइल किंवा स्मार्ट टीव्हीमध्ये वापरणारे अॅप इन्स्टॉल करताना प्रायव्हसी पॉलिसी न वाचताच इन्स्टॉल करता का? जर हो असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आधार कार्ड वापरण्यासाठी वैयक्तिक माहिती देण्याला विरोध करणारे, एखाद्या इन्स्टॉल केलेल्या अॅपला आपली सर्व माहिती अगदी सहजपणे देत असतात. परंतु या सर्वाचा परिणाम, म्हणजे आता तुमच्या बेडरूममधल्या हालचाली दुसरं कुणीतरी रेकॉर्ड करू लागलं आहे. त्यामुळेच स्मार्ट टीव्ही आणि मोबाइल हाताळणाऱ्यांनो जरा इकडे लक्ष द्या...

व्हाइस कमांड धोकादायक

स्मार्टफोन हॅकिंग ही सध्या अगदी सोपी गोष्ट झाली आहे. मोबाइलमध्ये वापरल्या जाणारे बहुतांश अॅप हे स्मार्ट टीव्हीत वापरले जातात. त्यामुळेच की काय २१ व्या शतकात स्मार्ट टीव्ही वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रेडिशनल टीव्हीपेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. इंटरनेटच्या मदतीने चालणाऱे स्मार्ट टीव्ही हॅक करणं आता सोपं झालं असून, हॅकर्संनी आपला मोर्चा आता या स्मार्ट टीव्हीकडे वळवला आहे. 

सॅमसंग टीव्ही मार्केटमध्ये सर्वात आघाडीवर आहे. नव्याने आलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये आधीपासूनच मायक्रोफोन असतात. या मायक्रोफोनमुळे आवाजाद्वारे आपण टीव्हीला आदेश देतो. त्यानुसार टीव्ही पुढे चॅनल बदलतो अथवा कार्य करतो. सध्या रिमोटला व्हाइस कमांड देऊन टिव्ही चालतो, असे टीव्ही ट्रेंडिंगमध्ये आहेत. काही स्मार्ट टीव्ही असे देखील आहेत, ज्यात व्हाइस कमांड कायमस्वरुपी सुरू असतात. त्यामुळे हॅकर्स टीव्हीद्वारे सहजपणे तुमचे बोलणं ऐकू शकतो. स्मार्ट टीव्हीसाठी स्पेशल अ‍ॅप स्टोर देखील आहे, ज्याद्वारे टीव्हीसाठी वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करता येतात.

कॅमेऱ्यांचं तुमच्यावर लक्ष

मार्केटमध्ये असे टीव्ही देखील आहेत, ज्यात कॅमेरे लावलेले आहेत. विचार करा की, जर हॅकर्सने स्मार्ट टीव्ही हॅक करून कॅमेरा आणि मायक्रोफोन कंट्रोल केला तर तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या समोरचा टीव्ही तो त्या सर्व हालचाली रेकाॅर्ड करेल.  रेकाॅर्ड केलेले हे व्हिडिओ पाॅर्न साईटवर अपलोडही होतील. हे अत्यंत धोकादायक असून याबाबत पिंपरीचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी सभागृहात प्रश्नही उपस्थित केले होते. ज्याप्रमाणे मालवेअर असलेल्या अ‍ॅपद्वारे फोन हॅक केला जातो त्याचप्रमाणे मालवेअर असलेले अ‍ॅप डाऊनलोड केल्याने स्मार्ट टीव्ही देखील हॅक केला जाऊ शकतो. कंपन्या स्मार्ट टीव्हीद्वारे वॉच हिस्ट्रीला समजते व त्याद्वारेच जाहिराती दाखवत असते.

'असे' होतात टीव्ही हॅक

 सध्या स्मार्ट टिव्हीची  मागणीनुसार बाजारात खूपच वाढलेली आहे. या स्मार्ट टिव्हींना संपर्क साधण्यासाठी टीव्हीच्या समोर एक कॅमेरा दिलेला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक अॅप्लिकेशन इन्स्टाॅल करत असताना, कुठलीही परवानगी विचारली जात नाही. त्याचा फायदा घेऊन तुम्हाला फुकटात सेवा पुरवणारे अॅप आयपीद्वारे नकळत तुमच्या सर्वरशी जोडले जातात. तुमच्या न कळत इतर कुणीतरी टीव्ही आणि इंटरनेट सुरू असताना तुमचे टीव्हीसमोरील खासगी क्षण पाहू शकतात आणि रेकाॅर्डही करू शकतात. 

गुजरातमधील त्या दोन घटनांत हॅकरने अशाच प्रकारे दोन दाम्पत्यांचे खासगी क्षण चित्रित केले होते. त्यातील एका जोडप्याला त्याने ब्लॅकमेलही केले होते. त्या प्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'एजंट स्मिथ' या व्हायरसची सध्या बाजारात खूप चर्चा आहे. जगातील २.५ कोटी फोन आदी उपकरणांमध्ये ते घुसले असून, त्यातील १.५ कोटी अँड्रॉइड मोबाईल भारतातील असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुठलेही अॅप्लिकेशन गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागत असेल, तर वेळीच सावध व्हा. आणि त्या अॅप्लिकेशनला मोबाइल किंवा टीव्हीतून कायमचे हद्दपार करा.

वाचण्यासाठी हे उपाय करा

  • जर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये कॅमेरा असेल, तर सेटिंग्जमध्ये जाऊन त्याला डिसेबल करा अथवा त्याच्यावर काळा टेप लावून त्याला झाकून टाका.
  • सेटिंग्जमध्ये जाऊन मायक्रोफोनचा नेहमीच सुरू असणारा पर्याय बंद करा.
  • कंपनीद्वारे येणाऱ्या अपडेटकडे दुर्लक्ष न करता वेळीच अपडेट करा.
  • स्मार्ट टीव्हीमध्ये कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका.
  • सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीच्या सेटिंगजमध्ये जाऊन अक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जाऊन स्मार्ट सिक्युरिटी पर्याय सुरू करा.
  • थर्ड पार्टी रिमोट अ‍ॅपचा वापर करू नये. कंपनीने दिलेला रिमोटच वापरावा.
  • स्मार्ट टिव्हीला कोणत्याही वाय-फायशी कनेक्ट करू नये. सिक्युर नेटवर्कशीच कनेक्ट करा.
  • जर ट्रेडिशनल टीव्ही वापरून तुम्ही खुष असाल तर स्मार्ट टीव्ही घेणं टाळू शकता.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा