आदित्य पांचोलीवर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल

आदित्य पांचोलीविरोधात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाॅलीवूडमधील एका नामांकित अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. आदित्य पांचोलीने आपल्यावर अनेक वेळा बलात्कार केला, असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

SHARE

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीने  आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. वर्सोवा पोलिसांनी  पांचोलीविरोधात ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


प्रकरण १० वर्ष जुनं

 आदित्य पांचोलीविरोधात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाॅलीवूडमधील एका नामांकित अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. आदित्य पांचोलीने आपल्यावर अनेक वेळा बलात्कार केला, असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. दरम्यान, हे प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे पांचोलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्याविरूद्धचे पुरावे गोळा करणं कठीण असेल. असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


न्यायालयाचं समन्स

 आदित्य पांचोलीने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहिण रंगोली चंदेल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, त्या दोघीही सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हत्या. अखेर यानंतर अंधेरी न्यायालयाने या दोघींना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसं समन्स न्यायालयाने दोघींना बजावलं. हेही वाचा  -

लोकलच्या दरवाजात मोबाइलवर बोलणं भोवलं

लाचखोर जीएसटी अधिक्षकावर गुन्हा
संबंधित विषय
ताज्या बातम्या