लोकलच्या दरवाजात मोबाइलवर बोलणं भोवलं

दरवाजात उभे राहून ते फोनवर निकटवर्तींशी बोलत होते. ते प्रवास करत असलेली लोकल गोरेगाव स्थानकावरून सुटली. त्यावेळी सिग्नलवर लपून उभा असलेल्या भोडकरने पिल्ले यांच्या डोक्यात लोंखडी राँड मारला.

SHARE

लोकलच्या दरवाजात उभे राहून मोबाइलवर बोलणाऱ्या ग्राहकांना दुखापत पोहचवून त्यांना लुटणाऱ्या टोळीचा बोरिवलीच्या रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिपक किशन भोडकर (२०) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिस अधिक तपास करत आहे.

नेमकं प्रकरण काय? 

कांदिवली पूर्व परिसरात राहणारे शक्ती पिल्ले (२३) हे २४ जून रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास मालाड ते चर्चगेट असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान शक्ती हे लोकलच्या दरवाजात उभं राहून मोबाइलवर  बोलत होते. ते प्रवास करत असलेली लोकल गोरेगाव स्थानकावरून सुटली. त्यावेळी सिग्नलवर लपून उभा असलेल्या भोडकरनं पिल्ले यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. बेसावध पिल्ले धावत्या लोकलमधून खाली पडले. जखमी पिल्लेजवळून भोडकरनं २१ हजारांचा मोबाइल चोरून पळ काढला.

आरोपीला अटक

या प्रकरणी जखमी पिल्ले यांना तातडीनं जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर बोरिवली पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली. पिल्ले यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पिल्ले यांना जखमी करून लुटणारा आरोपी गोरेगावच्या जवाहरनगर परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भोडकरला अटक केली. भोडकरनं अशा प्रकारे अनेकांना लुटल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.हेही वाचा -

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी अंतिम निकाल

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातपडताळणीविना प्रवेश – विनोद तावडेसंबंधित विषय
ताज्या बातम्या