सायनमध्ये पत्नीकडून पतीवर जीवघेणा हल्ला

दिनेश बुधवारी दुपारी आरबीआय काॅलनी परिसरातून जात असताना दिनेशच्या पत्नीने त्याची वाट अडवली. दोघांमध्ये रस्त्यातच जोरदार भांडण झाले. त्यावेळी तिने दिनेशच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

SHARE

कौटुंबिक वादातून मुंबईच्या सायन परिसरात पत्नीने भर रस्त्यात बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्यात दिनेश नायर (३७) हा गंभीर जखमी झाला असून त्याला  सायन रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी सायन पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्लेडने हल्ला

सायनच्या गुरू तेज बहादूर नगर परिसरात दिनेश हा कुटुंबियांसोबत राहतो. मागील अनेक दिवसांपासून त्याचे  पत्नीसोबत पटत नसल्यामुळे वारंवार खटके उडत होते. यातूनच दिनेशच्या पत्नीने दिनेशची हत्या करण्याचा कट रचला. मात्र एकट्याला दिनशेची हत्या करणे कठीण असल्यामुळे तिने तिच्या बहिणीच्या नवऱ्याला या कटात सहभागी करून घेतले. दिनेश बुधवारी दुपारी आरबीआय काॅलनी परिसरातून जात असताना दिनेशच्या पत्नीने त्याची वाट अडवली. दोघांमध्ये रस्त्यातच जोरदार भांडण झाले. त्यावेळी तिने दिनेशच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर दिनेशच्या साडूने त्याच्यावर ब्लेडने हल्ला करत तेथून पळ काढला.


अतिदक्षता विभागात उपचार 

दिवसाढवळ्या झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तातडीने स्थानिकांनी सायन पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेशला जवळील सायन रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.हेही वाचा -

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या