लाखोंच्या कोकेन तस्करी प्रकरणी परदेशी महिलेला अटक

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात ती रहात होती. शनिवारी राञी ती 7.8 ग्रँम कोकेनची तस्करी करण्यासाठी करण्यासाठी आली होती.

SHARE
लाखो रुपयांचे अंमली पदार्थ तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या परदेशी महिलेला ओशिवरा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. एडेन रेले (२५) असे तिचे नाव असून ती मूळची नायजेरीयन आहे. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.

एडेन ही फॅशन डिझायनर आहे. २०१८ मध्ये एडेन ही टूरिस्ट व्हिजावर मुंबईत आली होती. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात ती रहात होती. शनिवारी राञी ती ७.८ ग्रँम कोकेनची तस्करी करण्यासाठी करण्यासाठी आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. तिच्याजवळून हस्तगत केलेल्या कोकेनची किंमत ही ५ लाख ६८ हजार इतकी आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला असून  तिने हे कोकेन कुठून आणले याचा पोलिस आता शोध घेत आहे. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या