शाळा, महाविद्यालय परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक


शाळा, महाविद्यालय परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक
SHARES

चर्चगेट येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला आझाद मैदान युनिट 1 च्या अंमली पथक विरोधी पथकाने गुरुवारी अटक करण्यात आली आहे. मालन व्यंकटेश काळे (40) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.


अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई


चर्चगेट परिसरात अंमली पथक विरोधी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी महाविद्यालयीन परिसरात गस्तीच्यावेळी सदर महिला गांजाची विक्री करताना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेताच तिच्या बॅगेतून 30 ग्रॅम वजनाची 18 गांजाची पाकिटे मिळाली. सदर महिला ही चर्चगेट परिसरातील अहिल्याबाई होळकर बसस्टॉप येथील झोपडपट्टीत राहते. तिच्या विरोधात अंमली पदार्थ बाळगून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा