SHARE

मानखुर्द - पतीसोबत झालेल्या वादातून नवविवाहितेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडलीय. खुशनुमा खान (20) असे या महिलेचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह शाहबाज खान (22) याच्यासोबत झाला होता. तेव्हापासून दोघेही मानखुर्द मंडाला परिसरात रहात होते. मात्र दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. बुधवारी सकाळी भांडण झाल्यानंतर शाहबाज घराबाहेर गेला. याच दरम्यान खुशनुमा हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. शेजाऱ्यांनी आग विझवत तिला सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या