भुलीचं इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

निताशा आई-वडील आणि भावासोबत वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत वास्तव्याला होती. तिची आई आणि भाऊ दोघंही डॉक्टर आहेत. तर वडील एका बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात.

भुलीचं इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
SHARES

मुंबईतील (Mumbai) वरळी येथील एका २९  वर्षीय डॉक्टर तरुणीने (Woman doctor) आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आपलं जीवन संपवलं. निताशा बंगाली (Nitasha Bengali) असं या तरूणीचं नाव आहे. निताशा एमबीबीएस (mbbs) डॉक्टर होती. तर एमडीचे (md) शिक्षण घेत होती.

नैराश्यातून निताशाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. निताशा आई-वडील आणि भावासोबत वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत वास्तव्याला होती. तिची आई आणि भाऊ दोघंही डॉक्टर आहेत. तर वडील एका बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. 

गुरुवारी तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली. कुटुंबियांनी तिला नायर रुग्णालयात दाखल केलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

निताशाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट वगैरे लिहिली आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. तसंच या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का याचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.



हेही वाचा - 

  1. इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा