एसटी बसमध्ये महिलेवर गोळीबार

 Mira Bhayandar
एसटी बसमध्ये महिलेवर गोळीबार
Mira Bhayandar, Mumbai  -  

बोरिवलीहून ठाण्याला जाणाऱ्या एसटी बसमध्ये गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने पुढे बसलेल्या महिलेवर गोळीबार केला. पार्वती ठाकूर असे या महिलेचे नाव आहे. 

पार्वती बोरिवलीहून ठाण्याल्या जाणाऱ्या बसने प्रवास करत होत्या. त्यांच्या सीटच्या मागे एक व्यक्ती येऊन बसली आणि त्याने अचानक पार्वती यांच्यावर गोळी झाडली. बसमधल्या इतर प्रवाशांनी या व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. 

पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली पण, पार्वतीवर गोळी का झाडली याचे कारण त्याने अ़जून सांगितले नाही. या आरोपीचे नाव सुमेध करंदीकर आहे. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पार्वती यांना मीरा रोडच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल केले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Loading Comments