ताडदेव येथे राहणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला

 Tardeo
ताडदेव येथे राहणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला

महालक्ष्मी - महालक्ष्मी रेसकोर्स येथे एका महिलेवर चाकूनं हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जखमी महिलेला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रियंका तुकाराम पेडगुडे (२९) असं या जखमी महिलेचं नाव आहे. ताडदेव येथे राहणारी प्रियंका पतीपासून विभक्त राहत असून तिचा मुलगा तिच्या पतीसोबत राहतो. नोकरी करणाऱ्या प्रियंकाचे संदीप काश्मिरी (२२) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री 7 च्या दरम्यान संदीप प्रियंकाला भेटण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे गेला असता झाडाखाली बसलेली प्रियंका जखमी अवस्थेत त्याला दिसून आली. प्रियंकाच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्यात आल्याचं निदर्शनास येताच त्याने प्रियंकाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.

Loading Comments