अशीही चोरी...!

बोरिवली - चोरी करण्यासाठी नेहमीच नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जातात. मंगळवारी काजूपाडा इथल्या पूजा ज्वेलर्समध्ये एक महिलेनं अशीच चोरी केली आणि पसार झाली.

दसऱ्याच्या संध्याकाळी सातच्या सुमारास एक महिला पूजा ज्वेलर्स या दुकानामध्ये आली. तिने 20 हजारांच्या दागिन्यांची खदेरी केली. दुकानदार दागिने दाखवत असतानाच तिने एक कानात घालायची रिंग तोंडात लपवली. दुकानदार बिल बनवू लागताच, थांबा माझे पती येत आहेत, असं सांगून ती दुकानातल्या बेंचवर बसली आणि हळूच तिने तोंडात लपवलेली रिंग पर्समध्ये टाकली. मग दुकानातली गर्दी वाढल्यावर दुकानदार अन्य ग्राहकांना दागिने दाखवण्यात गुंतल्याचं पाहून ती पसार झाली. मात्र तिने केलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तिने चोरलेली रिंग आहे दोन हजारांचीच, पण चोरी करण्याची ही क्लुप्ती मात्र सर्वांना धक्का देऊन गेली.

Loading Comments