कामगाराचा मृत्यू झाल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल


कामगाराचा मृत्यू झाल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल
SHARES

आझाद मैदान - आझाद मैदान येथील धोबी तलाव परिसरातील लक्ष्मीचंद दिपचंद इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक बाराव्या मजल्या वरुन पडुन बुधवारी कामगाराचा मृत्यू झाला. गणेश रामचंद्र (२७) असं या कामगाराचे नाव असून, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी या इमारतीच्या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले आहेत. आझाद मैदान परिसरातील धोबी तलाव येथील लक्ष्मीचंद दिपचंद या इमारतीचे काम सुरु होते. या वेळी सर्व कामगार प्रत्येक मजल्यावर काम करत होते. अशातच गणेश रामचंद्र हा बाराव्या मजल्यावरील गॅलरीच्या बाजूचे काम करत होता. मात्र, अचानक त्याचा तोल गेल्याने, तो खाली पडला. या वेळी सर्व कामगारांनी गणेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तर या प्रकरणी सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही काळजी न घेतल्याने पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा