कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवण्याचा प्रयत्न

दिवसेंदिवस पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय.मुंबईत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण या घटनेनंतर कल्याणमध्ये गणपती विसर्जनावेळी पोलिस उपनिरीक्षकाला बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिसगाव नाका परिसरात गणपती विसर्जन सुरु असताना रात्री 9 ते 10 दरम्यान हा प्रकार घडला आहे. नितीन डगळे असं या पोलिस उपनिरिक्षकाचं नाव आहे. पोलिस उपनिरिक्षकाला बुडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरीमरी मंडळाच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना मागच्याच आठवड्यात आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्येच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत.

 

Loading Comments