मंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न


मंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

नरीमन पाँईट - मुंबईच्या सुरक्षेबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. पण जिथे मुंबईतलं मंत्रालयच सुरक्षित नाही, तिथे इतरांची काय कथा. मंत्रालयाची 'टाईट' सुरक्षाव्यवस्था भेदून कोणीही प्रवेश करु शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मालाड येथील एक बिल्डर एसआरएमधील सदनिका आपल्याला देत नाही, म्हणून संतापलेल्या एका तरूणाने हातात रॉकेलची बाटली घेऊन थेट मंत्रालयात प्रवेश केला. मंत्र्यांची ये-जा असलेल्या प्रवेशव्दारावरच त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहुन प्रवेशव्दारावर उभ्या असलेल्या लोकांची पळापळ उडाली. सुदैवाने त्या तरूणाला पोलिसांनी तत्काळ पकडून मरीनड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले. एनुमल्ले पेरूमल पिल्लई (वय 32) असे या तरूणाचे नाव आहे. मालाड येथील काचपाडा नं.2 मधील रामुभाई चाळीत तो रहात होता.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत एका बिल्डरने या ठिकाणी इमारत बांधली. तेथील झोपडीच्या बदल्यात बिल्डरने एनुमल्लेच्या वडीलांना सदनिका दिली होती. पण आपलेही येथे झोपडे होते. नियमानुसार आपल्यालाही सदनिका मिळावी, अशी मागणी तो बिल्डरकडे करत होता. बिल्डर दाद देत नसल्याचे पाहून त्याने अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला होता. गुरुवारी सांयकाळी तो भेट घेण्याच्या निमित्ताने आला असता, त्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दारावरच रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मिनरल वॉटरच्या बाटलीत रॉकेल आणलं होतं. त्यामुळे प्रवेशद्वारावरील पोलीस कर्मचाऱ्यांचा बाटलीत पाणी असल्याचा समज झाला, अशी सारवासारव पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा