दहिसरमध्ये तरुणाचा तमाशा

दहिसर - दहिसर पूर्व अशोकवन मधील हनुमान मंदिराजवळ शिवसेनेकडून बनवण्यात आलेल्या प्रवेशद्वारावर एक तरुण चढला असल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 20 फुट उंचीच्या प्रवेशद्वारावरुन तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रत्येकाच्याच नाकी नऊ आले होते. एका टेम्पोच्या साहायाने या तरुणाला खाली उतरवण्यात आले. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे या तरुणाची बॅनर्सवरुन दंगा मस्ती सुरु आहे ते. तरुणाला खाली उतरवल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी चौकशी केली असता हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading Comments