पाणीपूरी विक्रेत्याला मारहाण


SHARE

ठक्कर बाप्पा कॉलनी - रस्त्याने जात असताना धक्का लागल्याने एका पाणीपूरी विक्रेत्याला एका तरुणाने बेदम मारहाण केली आहे. रमेश गुप्ता असे या पाणीपूरी विक्रेत्याचे नाव असून तो चेंबूर परिसरात राहणारा आहे. रविवारी दुपारी हा पाणीपूरी विक्रेता सायकलवरुन जात असताना एका अनोळखी तरुणाला सायकलचा धक्का लागला. याच कारणावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर भांडणात झाले आणि तरुणाने गुप्ताला जबर मारहाण केली. याबाबत गुप्ता यांनी नेहरु नगर पोलीस ठाण्यात इसमाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या