झवेरीबाजार इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल


झवेरीबाजार इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
SHARES

झवेरीबाजार इथं इमारत दुरुस्तीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या इमारतीचा काही भाग तोडताना स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी अाता मेसर्स चौहान काॅर्पोरेशन या कंपनीचे पदाधिकारी अाणि सुपरवायझरविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात अाला अाहे.


या इमारत दुर्घटनेत फिरोज खान, सफरूल सफिजुल हक, राँकी शेख, बरकतुला खान यांचा मृत्यू झाला होता. चिपी गल्ली, शामसेठ लेन ५०/५२ धनजी मुलजी बिल्डिंगच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना मेसर्स चौहान कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात अाली नव्हती. दुरुस्तीदरम्यान इमारतीचा काही भाग तोडताना कामगारांच्या डोक्यावर स्लॅब कोसळल्याने चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनोज खुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस करत अाहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा