Advertisement

तिरंगा फडकवताना 'हे' १० नियम लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते शिक्षा

अभिमानानं प्रत्येक भारतीय तिरंगा फडकावत असतो. मात्र, तिरंगा फडकावायला काही नियम आहेत. या नियमाचं उल्लंघन हा तिरंगाचा अपमान समजला जातो. हे नियम काय आहेत आणि तिरंगाबद्दल काही रोचक तथ्येे आपण जाणून घेऊयात.

तिरंगा फडकवताना 'हे' १० नियम लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते शिक्षा
SHARES

तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेत तिरंगाला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. हा तिरंगा आंध्र प्रदेशच्या पिंगाली वेंकय्या यांनी बनविला होता. अभिमानानं प्रत्येक भारतीय तिरंगा फडकावत असतो. मात्र, तिरंगा फडकावायला काही नियम आहेत. या नियमाचं उल्लंघन हा तिरंगाचा अपमान समजला जातो. हे नियम काय आहेत आणि तिरंग्याबद्दल काही मनोरंजक तथ्येे आपण जाणून घेऊयात. 


नियम आणि मनोरंजक तथ्येे

  • संसद भवन ही देशातील एकमेव इमारत आहे, जिथं एकाच वेळी ३ राष्ट्रध्वज फडकावले जातात.
  • भारताच्या राष्ट्रध्वजात चरख्याऐवजी अशोक चक्राला जागा देण्यात आल्याने महात्मा गांधी नाराज झाले होते. 
  • रांचीतील डोंगरावर असं एक मंदिर आहे, जिथं तिरंगा फडकावला जातो. भारतात इतर कोणत्याही मंदिरावर तिरंगा फडकावला जात नाही. ४६३ मीटर उंचीवर देशातील सर्वात उंच ध्वजही रांचीमध्ये फडकत आहे. 
  • देशात 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया' (भारतीय ध्वज संहिता) नावाचा एक कायदा आहे, ज्यामध्ये तिरंगा फडकाविण्याचे नियम देण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगातही टाकलं जाऊ शकतं.
  • तिरंगा नेहमी काॅटन, रेशीम किंवा खादीचा असावा. प्लास्टिक ध्वज बनवण्यास बंदी आहे.  
  • तिरंगा नेहमी आयताकृती आकारात तयार केला जातो. याचं प्रमाण ३:२ आहे
  • ध्वजांवर काहीही बनविणं किंवा लिहिणं बेकायदेशीर आहे.
  • तिरंगा कोणत्याही वाहनाच्या पाठीमागे, बोट किंवा विमानात ठेवता येणार नाही. किंवा इमारत झाकण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकत नाही.
  •  कोणत्याही परिस्थितीत तिरंग्याचा जमिनीला स्पर्श होता कामा नये, हा  तिरंगाचा अपमान आहे.
  • तिरंग्याचा वापर कोणत्याही युनिफाॅर्मवर किंवा सजावटीसाठी करता येत नाही.
  • दुसरा कोणताही झेंडा राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच किंवा मोठा ठेवता येणार नाही. तसंच तो समान उंचीवरही ठेवता येणार नाही. 
  • सामान्य नागरिकांना २२ डिसेंबर २००२ नंतर इतर दिवशीही त्यांच्या घरात किंवा कार्यालयात तिरंगा फडकावण्याची परवानगी मिळाली.
  • तिरंगा रात्री फडकवण्यास २००९ मध्ये परवानगी देण्यात आली
  • राष्ट्रपती भवनाच्या संग्रहालयात असा एक लहान तिरंगा आहे जो सोन्याच्या खांबावर हिरे आणि दागिन्यांनी बनवलेला आहे.
  • भारतीय राज्यघटनेनुसार जेव्हा एखाद्या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या व्यक्तीचं निधन होतं आणि राष्ट्रीय शोक जाहीर केला जातो, तेव्हा ज्या घरात त्यांचं पार्थिव ठेवलेले असते त्या घरावरील तिरंगा झुकवलेला असतो. पार्थिव त्या घरातून नेल्यानंतर ध्वज पुन्हा फडकावला जातो. 
  •  देशासाठी जीवन देणारे शहीद आणि देशातील महान व्यक्ति यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटलं जातं. यावेळी भगवी पट्टी डोक्याकडे असावी आणि हिरव्या रंगाची पट्टी पायांकडे असावी. मृतदेह जाळल्यानंतर किंवा दफन केल्यानंतर गुप्तपणे तिरंगा सन्मानपूर्वक जाळला जातो. 
  • फाटलेला किंवा रंग उडालेला तिरंगा देखील सन्मानपूर्वक जाळला जातो किंवा वजन बांधून पवित्र नदीमध्ये त्याला जलसमाधी दिली जाते. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा