Advertisement

समाजशास्त्र विभागाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाला सुरुवात

यंदा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विभागानं विविध विषयांवरील संशोधन आणि प्रकाशन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, व्याख्यान मालिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. ए.आर. देसाई मेमोरियल लेक्चर, जीएस घुरी मेमोरियल लेक्चर, इरावती कर्वे आणि पॅट्रिक गेडेस स्मारक व्याख्यान अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांच आयोजनही यानिमित्तानं करण्यात आलं आहे.

समाजशास्त्र विभागाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाला सुरुवात
SHARES

भारतासह आशियातील सर्वात जुनं समाजशास्त्राचं विभाग म्हणून मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाची ख्याती आहे. विद्यापीठात १९१९ साली समाजशास्त्र आणि मानववंश शास्त्र या विषयातील अभ्यास व संशोधनासाठी या विभागाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. २०१८-१९ वर्षी या विभागाला १०० वर्षे पूर्ण होतं असल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्लॅकचं अनावरण करत विभागाच्या शताब्दी वर्ष महोत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.


नामवंतांचं योगदान

प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ आणि शहर नियोजक सर पॅट्रिक गेडेस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली होती. प्राध्यापक विभाग प्रमुख असलेल्या सर पॅट्रिक गेडेस यांनी गेल्या ९ दशकात दक्षिण आशियातील समाजशास्त्रात शिक्षण व संशोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

भारतीय समाजशास्त्र आणि मानववंशीय जीवनातील अग्रगण्य व्यक्तींनी या विभागात त्यांचं प्रारंभिक प्रशिक्षण घेतलं. ज्यामध्ये एम. एन. श्रीनिवास, इरावती कर्वे, आय. पी. देसाई, वाई.बी. दामले, विलास सांगवे, आणि एम.एस.ए. राव यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.


अनेक उपक्रम

भारतीय समाजाच्या विविध आयामांशी संबंधित अनेक आंतर-विद्याशाखीय अभ्यासाचं महत्वाचं कार्य या विभागामार्फत केलं जातं. 'इंडियन सोशलॉजिकल सोसायटी' आणि त्याचे 'जर्नल सोशलॉजिकल बुलेटिन' या विभागाच्या प्राध्यापक घुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आली.


संशोधन कार्य सुरू

समाजशास्त्र विभागाची विशेष ख्याती म्हणजे या विभागाला २००४ पासून यूजीसी स्पेशल असिस्टन्स प्रोग्राम (यूजीसी-एसएपी) देण्यात आलं असून विभाग आता यूजीसी-एसएपीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. विभागामार्फत अनेक क्षेत्रात संशोधन कार्य सुरू असून नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतींसाठी विभाग प्रयत्नशील आहे.


व्याख्यान मालिकांचं आयोजन

यंदा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विभागानं विविध विषयांवरील संशोधन आणि प्रकाशन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, व्याख्यान मालिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. ए.आर. देसाई मेमोरियल लेक्चर, जीएस घुरी मेमोरियल लेक्चर, इरावती कर्वे आणि पॅट्रिक गेडेस स्मारक व्याख्यान अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांच आयोजनही यानिमित्तानं करण्यात आलं आहे.

प्राध्यापक कमला गणेश यांनी इरावती कर्वे मेमोरियल लेक्चरसह शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या महोत्सवातील पुढील व्याख्यान २६ ऑक्टोबर रोजी जीएस घुरी मेमोरियल लेक्चरही होणार असून प्रा. गोपाल गुरु यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं विभाग प्रमुख प्रा. रमेश कांबळे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

आयआयटी मुंबई देशात नंबर वन; क्यूएसकडून प्रथम मानांकन

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा