Advertisement

आयआयटी मुंबई देशात नंबर वन; क्यूएसकडून प्रथम मानांकन

क्वाक्वारेली सायमंड्स (क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसंच विविध खंडांतील विद्यापीठांचे मूल्यांकन जाहीर करते. जगभरातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मुल्यांकन जाहीर करण्यात येतं.

आयआयटी मुंबई देशात नंबर वन; क्यूएसकडून प्रथम मानांकन
SHARES


शिक्षण क्षेत्रातील क्यूएस (क्वाकक्वारेली सायमंड्स) या ब्रिटिश कंपनीनं केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी मुंबईला प्रथम मानांकन मिळालं आहे. त्यामुळं देशातही आयआयटी मुंबई नंबर वन ठरली अाहे. तर इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगळुरूला दुसर तर आयआयटी मद्रासला तिसरे स्थान मिळालं आहे.


विरोधाभास निर्माण

विशेष म्हणजे या ब्रिटिश कंपनीनं यापूर्वी केलेल्या जागतिक पाहणीत देशात बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सला सर्वात चांगल मानांकन दिलं होतं. त्यामुळे विरोधाभास निर्माण झाला होता. परंतु जागतिक आणि भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांच्या मानांकनाठी वापरलेले निकष वेगवेगळं असल्यानं एकाच संस्थेचा जागतिक यादीत आणि दुसऱ्या संस्थेचा भारतीय यादीत वेगळा क्रमांक लागला आहे, असं स्पष्टीकरण कंपनीच्या जनसंवाद विभागाच्या संचालिका  सिमोना बिझोझिरो यांनी दिलं.


अव्वल गुण

 क्यूएसने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात जागतिक पातळीवर मानांकन देताना शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी ४० टक्के गुण असतात. तर भारतीय पातळीवर यासाठी फक्त ३० टक्के गुण देण्यात येतात. भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन करताना शैक्षणिक लौकिकासाठी ३० टक्के, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या लेखी असणाऱ्या लौकिकासाठी २० टक्के, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तरासाठी २० टक्के, एकूण कर्मचाऱ्यांमधील पीएचडीधारक कर्मचाऱ्यांच्या प्रमाणासाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार दर प्राध्यापक शोधनिबंधांसाठी १० टक्के, स्कोपस डेटाबेसनुसार प्रत्येक शोधनिबंधाच्या झालेल्या उल्लेखांसाठी ५ टक्के, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रमाणासाठी प्रत्येकी २.५ टक्के अशी या गुणांची विभागणी करण्यात येते. या विभागणीत आयआयटी मुंबईला अव्वल गुण प्राप्त झाले अाहेत.


विद्यापीठांचे मूल्यांकन 

क्वाक्वारेली सायमंड्स (क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसंच विविध खंडांतील विद्यापीठांचे मूल्यांकन जाहीर करते. जगभरातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मुल्यांकन जाहीर करण्यात येतं. याआधी कंपनीनं चीनच्या काही शिक्षणसंस्थांच मुल्यांकन केलं असून येत्या काही दिवसात जपान आणि दक्षिण कोरियातील शिक्षणसंस्थांचे मूल्यांकन केलं जाणार आहे.



हेही वाचा -

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत 

प्रभारींचा भार होणार हलका, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढली जाहिरात




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा