Advertisement

प्रभारींचा भार होणार हलका, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढली जाहिरात

मुंबई विद्यापीठातील महत्त्वाची पदे भरण्याकरीता नुकतीच विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रभारींचा भार होणार हलका, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढली जाहिरात
SHARES

मुंबई विद्यापीठातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जीवावर सुरू अाहे. या कारभाराला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. मुंबई विद्यापीठातील कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचं संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक तसंच नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे चालक या रिक्त जागा भरण्याकरिता मुंबई विद्यापीठाकडून जाहिरात देण्यात आली आहे.


कामावर परिणाम

मुंबई विद्यापीठातील विविध विभागांचे संचालक तसंच प्रमुख पदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी व्यक्ती सांभाळत आहेत. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजाचा कणा असलेलं कुलसचिव पदही रिक्त असून त्याचा कारभारही प्रभारी कुलसचिवांच्या माध्यमातून चालवला जात आहे. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने मुंबई विद्यापीठाच्या कामांवर त्याचा परिणाम होत असल्याच्या बाबी सातत्यानं समोर येऊ लागल्या आहेत.


२९ आॅक्टोबरपर्यंची मुदत

यामुळे नुकत्याच पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली. या पदांची जाहिरात काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार नुकतीच विद्यापीठाच्या वेबसाइटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.हेही वाचा-

यंदाही विद्यापीठाचा परीक्षा गोंधळ; बीएसस्सी सेमिस्टर परीक्षा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाविरोधात न्यायालयात याचिकाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय