यंदाही विद्यापीठाचा परीक्षा गोंधळ; बीएसस्सी सेमिस्टर परीक्षा लांबणीवर

बीएस्सीची परीक्षा ३० ऑक्टोबरला सुरू होणार होती. मात्र काही कॉलेजांच्या प्रॅक्टिकल परीक्षा अद्याप पार न पडल्यानं विद्यापीठानं ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठ निकाल वेळेवर लागल्याचा ठेंभा मिरवत असताना आता पुन्हा एकदा परीक्षेच्या निकाल गोंधळामुळं विद्यापीठ चर्चेत यायला सुरूवात झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणारी बीएसस्सी सेमिस्टर पाच ही परीक्षा परीक्षा व मूल्यमापन मंडळानं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १३ नोव्हेंबरपासून ही परीक्षा घेण्यात येईल असं परिपत्रक विद्यापीठानं जारी केलं आहे.


प्रॅक्टिकल परीक्षा बाकी

विद्यापीठ प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांची दिवाळीची सुट्टी अभ्यासात जाणार अाहे.  मुंबई विद्यापीठाच्या बी.कॉमच्या परीक्षेला येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून ही परीक्षा ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी दिली जाईल. बीएस्सीची परीक्षा ३० ऑक्टोबरला सुरू होणार होती. मात्र काही कॉलेजांच्या प्रॅक्टिकल परीक्षा अद्याप पार न पडल्यानं विद्यापीठानं ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


विद्यापीठानं उन्हाळी सत्राची परीक्षा व निकाल वेळेत लावले होते. त्यानंतर विद्यापीठातील गोंधळ कमी होतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु विद्यापीठानं बीएस्सीची संपूर्ण परीक्षा पुढं ढकल्यानं विद्यापीठातील परीक्षा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या परीक्षा गोंधळामुळं दिवाळीच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. परीक्षा पुढे गेल्याने निकालही उशीरा लागणार अाहेत.
- सचिन पवार, अध्यक्ष, छात्रभारतीहेही वाचा -

रात्रशाळा शिक्षकांचं समायोजन करा - शिक्षक भारती

मुंबई विद्यापीठाविरोधात न्यायालयात याचिका
संबंधित विषय
ताज्या बातम्या