Advertisement

रात्रशाळा शिक्षकांचं समायोजन करा - शिक्षक भारती


रात्रशाळा शिक्षकांचं समायोजन करा - शिक्षक भारती
SHARES

रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचा समावेश २०१७-१८ आणि २०१८-१९ साठी तयार होणाऱ्या अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या यादीत करावा तसंच या त्यांच्या यादीतील सेवाज्येष्ठता क्रम बदलू नये, अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.


रात्रशाळांमधील शिक्षकांबाबत दुजाभाव

१७ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ कॉलेजातील दुबार शिक्षकांना सेवामुक्त करण्यात आल्यानं रात्र शाळांमध्ये जागा रिक्त झाल्या. रात्र कनिष्ठ कॉलेजातील अतिरिक्त शिक्षक नसल्यानं शासन निर्णयानुसार कमी केलेल्या शिक्षकांना पूर्ववत कामावर रुजू करण्यात आलं आहे. परंतु, रात्रशाळांमधील शिक्षकांबाबत दुजाभाव करत असून दिवसाच्या शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तात्पुरत्या स्वरुपात रात्रशाळांमध्ये समायोजन करण्यात आलं आहे.


शिक्षक भारतीची मागणी

वर्ष २०१६-१७ च्या संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. या यादीतील काही शिक्षकांचे रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाच समायोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करताना रात्रशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात समायोजन केलेल्या शिक्षकांचा समावेश करावा. तसंच त्यांचा यादीतील सेवाज्येष्ठता क्रम बदलू नये, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा