Advertisement

शनिवारपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया


शनिवारपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया
SHARES

शनिवारपासून ११वी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. राज्यातील ६ महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. शिवाय ग्रामीण भागातही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. ११ प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. शनिवारपासून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे. तर १७ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे.

२५ ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर जे पसंती क्रमांक मिळाले आहेत त्यानुसार २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत कॉलेज मिळालं आहे हे कळेल.

त्यानंतर २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निश्चित करायचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंत नसेल तर ३० ऑगस्टला संध्याकाळी १० वाजता रीक्त जागांबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या गुणवत्ता यादीबाबब हे वेळापत्र जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांनतर दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यापुढचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा