Advertisement

आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत २,३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश


आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत २,३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश
SHARES

शिक्षण हक्क अधिकार कायदा (आरटीई) नुसार समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित आणि वंचित घटकातील मुलांसाठी खासगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित असतात. त्यानुसार शिक्षण विभागाने सोमवारी प्रवेशाची पहिली लॉटरी जाहीर केली. दुसऱ्या सोडतीमध्ये मुंबई विभागातून २ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. ही सोडत सोमवारी दुपारी शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली.


एकूण किती शाळा

यंदा मुंबई विभागातून आरटीईअंतर्गत ३४७ शाळा पात्र आहेत. यामध्ये राज्य मंडळाच्या ३०० तर अन्य मंडळाच्या ४७ शाळांचा समावेश आहे.


इतक्या जागासाठी सोमवारी सोडत

गेल्या महिन्यात झालेल्या आरटीई पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेनंतर दुसऱ्या फेरीसाठी सहा हजार २५९ जागा शिल्लक राहिल्या होत्या. या जागांसाठी सोमवारी सोडत काढण्यात आली.


या विद्यर्थ्यांची निवड

यामध्ये २ हजार ३८२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून आतापर्यंत या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ८५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या सोडतीमध्ये १४८५ विद्यार्थ्यांची इयत्ता पहिलीमध्ये तर ८९७ विद्यार्थ्यांची पूर्व प्राथमिक विभागात निवड झाली आहे. आरटीईच्या दुसऱ्या फेरीत निवड करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या सोडतीत प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या सोडतीत निश्चितच प्रवेश मिळेल.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा