Advertisement

विशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महाविद्यालयांमधील अकरावीच्या विशेष फेरीत २० हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालय मिळूनही प्रवेश नाकारला आहे.

विशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ
SHARES

अकरावीच्या तीन नियमित फेऱ्यांनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी प्रवेश समितीनं आयोजित केली होती. मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महाविद्यालयांमधील अकरावीच्या विशेष फेरीत २० हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालय मिळूनही प्रवेश नाकारला आहे

प्रवेश निश्चित

विशेष प्रवेश फेरीसाठी १ लाख २६ हजार ५५६ जागा शिल्लक होत्या. त्यासाठी आलेल्या ५६ हजार ३७५ अर्जांपैकी ४८ हजार ६६४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालं होतं. मात्र, यातीली तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. या फेरीत महाविद्यालय मिळून अवघ्या २८ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

या विशेष प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी प्रतिसाद न दिल्यानं कनिष्ठ महाविद्यालयांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर होणाऱ्या प्रवेश फेरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. तसंच, पुनर्परीक्षेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मिळण्याची आशा या महाविद्यालयांना आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील फेरीच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश बुधवारपासून सुरू होणार आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल आणखी होणार स्मार्ट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच मुंबई दौऱ्यावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा