Advertisement

मुंबईत २०६ बेकायदेशीर शाळा, पालिकेने केलं 'हे' आवाहन

मुंबईत बेकायदेशीररित्या २०६ खासगी शाळा चालवल्या जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या शाळांना शैक्षणिक अभ्यासक्रम चालवण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

मुंबईत २०६ बेकायदेशीर शाळा, पालिकेने केलं 'हे' आवाहन
SHARES

मुंबईत बेकायदेशीररित्या २०६ खासगी शाळा चालवल्या जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या शाळांना शैक्षणिक अभ्यासक्रम चालवण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला कायदेशीर वैधता नाही, असं मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलं आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी विशेष परवानग्या घेणे आवश्यक आहे. या शाळांनी त्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे या बेकायदेशीररित्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलं आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मुंबईत सर्वाधिक बेकायदा शाळा मालाड, मालाड-मालवणी, घाटकोपर, भांडुप तसेच एम इस्ट वॉर्डातील (एम पूर्व वॉर्ड) मानखुर्द आणि गोवंडी या भागात आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या १६२, उर्दू माध्यमाच्या १६, हिंदी माध्यमाच्या १५ आणि मराठी माध्यमाच्या १३ शाळा आहेत.

यामधील काही शाळा केंद्रीय मंडळ तर, काही शाळा आयजीसीएसई मंडळाच्या आहेत. मुंबई महापालिकेने सर्व बेकायदा शाळांना कारभार ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. 

बेकायदा शाळांनी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्याआधारे संबंधित शाळांचे व्यवस्थापन मनपाच्या शिक्षण विभागाकडे परवानगी मिळवण्यासाठी अर्ज सादर करू शकते. पण आधी बेकायदेशीररित्या अभ्यासक्रम चालवले असल्यास संबंधित शाळांना एक लाख रुपये दंड लागू होणार आहे.

हा दंड भरुन तसेच राज्य सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करुनच खासगी शाळांचे व्यवस्थापन मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाकडे परवानगी मिळवण्यासाठी अर्ज सादर करू शकते. मनपाने परवानगी दिली तरच शाळा वैध होणार आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा