Advertisement

barti fellowship: यंदा ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. आंबेडकर फेलोशिप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

barti fellowship: यंदा ४०८ विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. आंबेडकर फेलोशिप
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत पीएचडी किंवा एमफिल चं शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (BANRF – २०१८) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय (408 students will get barti babasaheb ambedkar national research fellowship) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

विशेष बाब म्हणून

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात कामावर परत रुजू झाले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केवळ या वर्षीच covid 19 ची उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

या फेलोशिपसाठी अर्ज दाखल केलेल्या पीएचडी अथवा एमफिलचं शिक्षण घेत असलेल्या सर्व ४०८ विद्यार्थ्यांना आता या फेलोशिपचा लाभ मिळणार असून या संबंधी सर्व ४०८ पात्र विद्यार्थ्यांना मेलद्वारे कळविण्यात आलं आहे.

हेही वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह'वर दगडफेक, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती 

सर्वांना लाभ

बार्टीमार्फत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी यासाठी जाहिरात देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार त्यानुसार ५९७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४०८ विद्यार्थी पात्रता यादीत होते.

विद्यार्थ्यांची मागणी

बार्टीच्या नियमाप्रमाणे या पात्र यादीमधून पीएचडीसाठीचे ६०% व एमफिल साठी चे ४०% असे एकूण १०५ विद्यार्थी गुणवत्तेनुसार फेलोशिपसाठी निवडले जातात, परंतु पात्र सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिपचा लाभ देण्यात यावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती, त्यानुसार निर्णय घेऊन ना. मुंडे यांनी सर्व पात्र ४०८ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला असून, फेलोशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांनी मुंडेंचे आभार मानले आहेत.

वाढीव निधी

या निर्णयामुळे नियमित १०५ विद्यार्थ्यांना द्यावयाच्या फेलोशिपसाठी ४ कोटी २२ लाख रुपये इतका निधी अपेक्षित असताना ४०८ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यास मान्यता दिल्याने  ३०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी प्रथम वर्षाकरिता १२ कोटी १८ लाख रुपये इतका वाढीव निधी लागणार असल्याचं बार्टीचे संचालक कैलास कणसे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा