Advertisement

गुरु देवो भव :


गुरु देवो भव :
SHARES

शिक्षक हे बदलत्या समाजजीवनात आपले कर्तृत्वपणाला लावून विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत असतात, त्यामुळे समाजातील त्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी केले. बृहन्मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महापालिका शाळा, अनुदानित आणि विना अनुदानित खासगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांना सन २०१५-१६ चा ‘महापौर पुरस्कार’ प्रदान करण्याचा समारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पार पडला. विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे पार पडला.या समारंभात महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते ५ राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि ५० महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना महापालिकेचे मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करुन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वरुपात प्रत्येकी १० हजार रुपये रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण श्री. रविंद्र वायकर; खासदार आणि शिवसेना सचिव श्री. अनिल देसाई; शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती हेमांगी वरळीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती आय. ए. कुंदन तसेच अनेक विभागाच्या नगरसेवक उपस्थित होत्या.तसंच महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्य गुणवत्तेच्या दृष्टीने प्रतिवर्षी उंचावत आहे. शिक्षण हा विषय सामाजिकतेला धरुन आहे. यामुळे शिक्षकांचे कार्य सामाजिक स्वरुपाचे आहे. महापालिका शाळांतील शिक्षकांचे योगदान हे शिक्षण विभागाच्या गुणवत्तेसाठी भरीव कामगिरी बजावत आहे असंही महापौर म्हणाल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा