Advertisement

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कार्ड


पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कार्ड
SHARES

मुंबई - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि पॅरेन्टस् असोसिएशन ऑफ थॅलेसिसीम यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेतील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा रक्त गट आणि रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. 8,9 आणि 10 वी इयत्तेच्या अंदाजे 52 हजार विद्यार्थ्यांची ही तपासणी होणार असून, त्यानंतर त्यांना संगणकीय आरोग्य कार्ड देण्यार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलीय.

मुंबई महानगरपालिकेत 8 वी, 9 वी, आणि 10 वीच्या विदयार्थ्यांच्या विविध चाचण्या घ्याव्या आणि आरोग्य कार्ड बनवावे अशी ही संकल्पना असल्याचं ते यावेळी म्हणालेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध टेस्ट यावेळी करण्यात येणार आहे. जेणेकरून एखाद्या मुलाला काही व्याधी असल्यास त्याचवेळी त्याच्यावर उपचार करण्यात येतील. असंही सुभाष देसाई म्हणालेत.

या चाचण्या 4 ग्रुपमध्ये करण्यात येणार असून, अंधेरीतील मुख्य लॅबमध्ये त्याची तपासणी करण्यात येईल. आणि विशेष म्हणजे यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर गंभीर आजार आढळल्यास त्याचा सर्व खर्च केला जाणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली. मुंबईनंतर आमची दुसरी शाखा नाशिकमध्ये सुरू झालीय. नाशिक आणि आसपासच्या परिसरातील मुलांच्या आरोग्यावर लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गायक व पॅरेन्टस असोसिएशन ऑफ थॅलेसिसीमचे अध्यक्ष पंकज उदास यांनी सांगितले. देशातून अनेमिया,थॅलेसेमिया हद्दपार करण्याचा आम्ही करत असल्याचही ते म्हणालेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय