Advertisement

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. अर्ज केलेल्यांपैकी ६१ टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालं आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
SHARES

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विभागात १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत महाविद्यालय मिळालं आहे. तर ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालेलं आहे. 

मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयाचा कट ऑफ ९० टक्क्यांवर लागला आहे. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत आहे.  अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. अर्ज केलेल्यांपैकी ६१ टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालं आहे.  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार,मुंबई महानगर प्रदेश, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या अकरावी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जात आहे. 

पहिली गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ यादी अधिकृत वेबसाइट 11thadmission.org वर जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी सामान्य फेरीसाठी नोंदणी केली आहे ते गुणवत्ता यादी ऑनलाइन तपासू शकतात.  जारी केलेल्या वेळापत्रकानुसार अलॉटमेंट यादी जारी केली जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा