Advertisement

विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक

सध्या अध्यापनाचा घसरलेला दर्जा, निकालातील गोंधळ, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमतरता अशा विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत चालला आहे. विद्यापीठातील या भोंगळ कारभारात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक
SHARES

मुंबईसह राज्यातल्या विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा खालवत चालला असून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी रेटिंग एजन्सीही नेमण्यात येणार आहे.

सध्या अध्यापनाचा घसरलेला दर्जा, निकालातील गोंधळ, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमतरता अशा विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत चालला आहे. विद्यापीठातील या भोंगळ कारभारात सुधारणा करण्यासाठी या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.


खासगी संस्था नेमणार

येत्या काही महिन्यात राज्यातील विद्यापीठातील शिक्षण पद्धतीचं मूल्यांकन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगी संस्था नेमण्यात येतील.

या खासगी संस्थेची निवड करण्यासाठी एक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात येईल. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, उच्च शिक्षण संचालक आणि रुसा सहसंचालक यांचा समावेश करण्यात आला आहे.


१३ विद्यापीठं, १०० कॉलेजांची निवड

यासाठी राज्यातील १३ विद्यापीठं आणि संलग्नित १०० कॉलेजांचीही निवड करण्यात येईल. ही समिती पाच वर्षांसाठी नेमण्यात आली असून या समितीच्या दर तीन महिन्यांनी बैठका आयोजित करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.


हेही वाचा -

आयडॉल प्रवेशाचा गोंधळ सुरूच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा