आमची मुंबई, सुंदर मुंबई!

मुंबई - स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी या मुलांचा आग्रह आणि त्याच आग्रहासाठी त्यांनी सुरु केलेली ही मोहीम. मुंबईला सुंदर बनवण्यासाठी आता लहान मुलांनीच पुढाकार घेतलाय. प्रभा विनायक गणेशोत्सव मंडळाने स्वच्छ मुंबई बनवण्यासाठी मोहीम सुरू केलीय. विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही बच्चे कंपनी दक्षिण मध्य मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी खराब झालेल्या भिंती चित्रांच्या माध्यमातून सुशोभित करणार आहेत. या वेळी 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटातील कलाकारांनीही या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. 

मुंबईला सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशन सुशोभित केले. आता शाळेतील विद्यार्थी तुम्हाला स्वच्छतेचे धडे देताना दिसतील. त्यामुळे आता या स्वच्छतेची निगा राखणे ही आपली जबाबदारी आहे.

Loading Comments