Advertisement

राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी

मुंबईसह राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे. सुरूवातील पालघर, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३ महिन्यांसाठी प्राथमिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर तो राज्यातील इतर भागांतील शाळांमध्येही राबविण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

बायोमेट्रिक हजेरी

उपक्रमानुसार ३ महिन्यांसाठी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचाही या उपक्रमात समावेश आहे. ज्युनिअर कॉलेजांतील विज्ञान शाखेचे विद्यार्थी कॉलेजांत नियमित उपस्थित न राहता कोचिंग क्लासला प्राधान्य देत असल्याने अशा कॉलेजांमधील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. आता त्याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागानं पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेतला आहे.

शाळांची यादी जाहीर

या उपक्रमासाठी जिल्हानिहाय शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढून थेट अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. हा उपक्रम तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून, त्यानंतर तो राज्यातील इतर भागांतील शाळांमध्येही राबविण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

खासगी कंपन्याची नेमणूक

यासंदर्भात ११ खासगी कंपन्याची नेमणूक करण्यात आली असून, कंपनीनिहाय शाळांचं नियोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल या कंपन्यांकडून शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. मात्र, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारतर्फे शाळांना कोणतीही अर्थिक मदत केली जाणार नाही. शाळांना डिजिटल यंत्रणेसाठी वीजपुरवठा करावा लागणार आहे.



हेही वाचा -

राज्यात लवकरच ५० शिवभोजन केंद्रावर १० रुपयात जेवण

पश्चिम रेल्वेच्या ३६ स्थानकांमध्ये आधुनिक उद्यानं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा